श्रीगोंदा : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सलून व्यावसायिकांना आदेश काढुन सलुन दुकान दि. 23 मार्च पासून बंद ठेवण्यास सांगितले. या काळामध्ये सलून व्यवसायिकांनी आपले आदेश पाळून सलून व्यवसाय पूर्णतः बंद ठेवले. पण सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असता.
अनेक वेळा निवेदन देऊन हि सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नाही. तामिळनाडू, दिल्ली या सारख्या राज्यांनी सलून व्यवसायास नियमासह परवानगी दिली आहे. अशा प्रकारे नियमावली घालून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. किंवा दरमहा १० हजार रु. प्रत्येकी सलून व्यावसायिकास (दुकान मालक व कारागीर) यांना तातडीने देण्यात यावेत अशी मागणी आता सलून व्यवसायिकांमधून होत आहे. जर आमची मागणी मान्य होणार नसतील तर दि.८ जुन 2020 पासून लोकशाहीच्या मानवी मूल्यांच्या अधिकारानुसार आम्ही कुठल्याही आंदोलनाची भूमिका घेऊ शकतो. आणि या आंदोलनामुळे काही परिणाम उध्दभवल्यास सर्वतोपरी शासन आणि शासनच जबाबदार राहिल असे या निवेदनात म्हटले आहे. श्रीगोंदा तालुका बारा बलुतेदार महासंघ व श्रीगोंदा तालुका नाभिक महामंडळ यांच्या वतीने आज श्रीगोंदा तहसील कार्यालयात श्रीगोंदाचे तहसीलदार महेंद्र माळी व नायब तहसीलदार सौ.चारुशिला पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नाभिक युवक जिल्हाध्यक्ष अजय रंधवे, अहमदनगर जिल्हा बारा बलुतेदार महासंघाचे नेते कांतीलाल कोकाटे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष विजय क्षिरसागर, शिवराय केसरी रोहन रंधवे, १२ बलुतेदार जिल्हा सचिव इंद्रजित कुटे, युवक जिल्हा संपर्क प्रमुख शरद शिंदे, १२ बलुतेदार जिल्हा संपर्क प्रमुख गणेश शिंदे, मल्हारी रंधवे, श्रीगोंदा शहराध्यक्ष राजेंद्र कुटे, अशोक सांगळे, रोहित क्षिरसागर, सनी दळवी, अनिल राऊत, सागर राऊत, महेश शिंदे, माऊली कोकाटे, अक्षय दळवी यावेळी उपस्थित होते.

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद