शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने निघोज मध्ये रक्तदान शिबीर.

0
पारनेर दि.०७:  तालुक्यातील निघोज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. शिबीर वरखडे वस्ती येथील दत्तमंदिर सभागृहात पार पडले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद व वडनेर च्या माजी सरपंच व सदस्य स्वाती नर्हे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
   यावेळी निघोज नागरी पतसंस्था चेअरमन वसंत कवाद, सचिन पाटील वराळ, रमेश वरखडे, रोहिदास लामखडे, अशोक ढवळे, राजुभाउ लाळगे, सरपंच संपत वाढवणे, विठ्ठल कवाद, भिमाशेठ लामखडे, महाराज गृप अध्यक्ष कुमार महाराज नाणेकर, मंगेश लाळगे, भास्कर कवाद, दत्ता कवाद,प्रा.शिवव्याख्याते कवाद सर, प्रा.कवडे सर आदि मान्यवर उपस्थित होती.
सर्व रक्तदात्यांचे ऋणी असल्याचे अनिल शेटे यानी सांगितले व दरवर्षी छत्रपती संभाजी राजेंच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबीर घेण्याचा मानस व्यक्त केला. या सामाजिक उपक्रमाचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यानी कौतुक केले.

यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश लंके. राहुल शेटे, शंकर पाटील वरखडे, नवनाथ बरशिले, शैलेश ढवळे, निलेश वरखडे, अंकुश वरखडे, शरद वरखडे, साई ढवण, राजु लंके व अनेक सहकार्यानी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top