पारनेर दि.०९ : तालुक्यातील नाभिक बांधवांनी सलून व्यवसायीयांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी किंवा परवानगी दयायची नसेल तर दरमहा दहा हजार रुपये आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अहमदनगर जिल्हा नाभिक महामंडळाचे सर्वेसर्वा माननीय कल्याण जी दळे व जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका तहसिलदार ज्योती देवरे यांना पारनेर तालुक्यातील नाभिक बांधवांनी निवेदन दिले आहे.
गेले तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक बांधवांवर उपासमारीची वेळ आली असून दरमहा दहा हजार रुपये आर्थिक पॅकेज जाहीर करावे व कंडोमेन्ट झोन वगळता इतर भागातील सलून व्यवसायीकाना दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी या अर्थाचे निवेदन देण्यात आले. यावेळी पारनेर तालुका अध्यक्ष भाऊ बीडे, उपाध्यक्ष शाम साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष शामराव जाधव, सचिव विनायक कुटे, सुनिल आतकर, सलुन असोसिएशन चे अध्यक्ष घनश्याम कार्ले, उपाध्यक्ष निलेश गायकवाड कार्याध्यक्ष दिपक कार्ले, महिला प्रमुख माधुरी कोरडे, सागर आतकर, युवाध्यक्ष प्रसाद भोसले, विजय कार्ले, कैलास कार्ले, बाळा पंडित, अविनाश पंडित, ज्ञानदेव कोरडे, भगवान आतकर, राहुल खंडागळे, दिपक कुटे, नवनाथ काळे, माऊलीं काळे, रामेश्वर घायतडक, शशिकांत राऊत, पोपट राऊत, अमोल खंडागळे, लक्ष्मण जाधव, मंगेश काळे, दीपक शिंदे,माउली कोरडे,मछिंद्र वाघमारे, सौरभ भोसले, अभिजीत भोसले, गणेश जाधव, नवनाथ कूटे, विष्णु कोरडे, नीलेश पंडित इत्यादी नाभिक बांधव पारनेर तालुक्यातून मोठया संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद