संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे टाळमृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

0
पारनेर :  तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या व एकोबा तुकोबा निळोबा नामघोषाने पिंपळनेर नगरी दुमदुमली होती. पारनेर तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या हस्ते संत निळोबाराय महाराज यांच्या संजीवनी समाधीचे पूजन करून पादुकांचे पूजन करून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
कोरोनाचे संकट लवकर दूर कर माझा शेतकरी राजा सूखी होउ दे- आमदार निलेश लंके
दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी पंढरपूर वारीचा सोहळा होत असतो परंतु चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने व शासनाचे अधिकारी यांनी दिलेले नियमाचे पालन करत वीस भाविकांसह प्रस्थान केले. यावेळी आमदार निलेश लंके यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला व निळोबारायांकडे प्रार्थना केली की पांडुरंगा माझ्या देशावरील व राज्यावरील  कोरोनाचे संकट लवकर दूर कर माझा शेतकरी राजा सूखी होउ दे असे साकडे घातले.

यावेळी देवस्थान कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले की पंढरपूरच्या आषाढी वारी चे खरे जनक संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज संत निळोबाराय महाराज यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सुरू केलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून चालू वर्षी त्यांच्या पादुका मोजक्या वारकऱ्यांचा सह पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.
यावेळी निळोबाराय देवस्थान अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत,  निळोबाराय वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळ मकाशीर, सुरेश  पठारे, निळोबाराय महाराज संस्थान सचिव लक्ष्मण खामकर, खजिनदार चांगदेव शिर्के, भाऊसाहेब लंटाबळे, हभप विकासानंद मिसाळ महाराज, राजेंद्र पठारे, संपत सावंत, उपजिल्हाधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक विजय बोत्रे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top