पठारवाडीतील तरुणाची आत्महत्या... आत्महत्तेपूर्वी तयार केली सुसाईड नोट वाचा सविस्तर...

0
पारनेर - पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील २१ वर्षीय तरुणाने पोल्ट्री फार्मच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असून याबाबत पारनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किरण लहू पवार (वय २१) या तरुणाने दि १३ रोजी १२:३० च्या सुमारास पठारवाडी येथील शेत गट नं ८७३ मध्ये असणाऱ्या पोल्ट्री मध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला संकेत भाऊसाहेब सुपेकर यांनी माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत.
आत्महत्तेपूर्वी मयत तरुणाने चिट्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये निघोज येथील व्यक्तीसह एका तरुणीच्या नावाचा उल्लेख आहे. तरुणीसोबत मयत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचे त्यात नमूद आहे. त्यामुळे सविस्तर बाबी पुढील पोलीस तपासामध्ये उघड होतील.

तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत तरुणांने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी ही हस्तगत केली आहे. त्या दृष्टीनेच पुढील तपास केला जाईल.-----------------------राजेश गवळी(पोलीस निरीक्षक पारनेर)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top