पारनेर : तालुक्यातील कोविड सेंटर मधील कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड त्वरित थांबवावी व दोषी आरोग्य यंत्रणेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष पारनेरच्या वतीने करण्यात येत आहे.
जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही त्रस्त झालेली असताना आता आरोग्य विभागसुद्धा लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष पारनेरच्या वतीने करण्यात येत आहे
.
देशावर जसे कोरोना चे संकट आहे तसे पारनेर तालुक्यातील जनतेवरही आले आहे. जनता मोठ्या धैर्याने त्याचा सामना करत आहे. परंतु आरोग्य यंत्रणेच्या चुकिच्या धोरणामुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. याला जबाबदार कोण ? प्रशासन कोविड रुग्ण सापडला कि सरकारी दवाखाना किंवा कोविड सेंटर मध्ये भरती करत असते व नंतर त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. त्याच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. त्याठिकांनी आरोग्य विभाग व अधिकारी पुन्हा फिरकतही नाही. पेशेंटच्या आरोग्याची रोजची अपडेटही यांच्याकडे नसते. रुग्णास काहि त्रास होतोय का याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. अशा आरोग्य यंत्रणेच्या चुकीमुळे गोरगरीब जनतेचा बळी जात आहे. असा आरोप शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांनी केला आहे.
शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांनी दोषी आरोग्य यंत्रणेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु, खासदार सुजय विखे,आमदार निलेश लंके, प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, जिल्हाअधिकारी अहमदनगर, तहसिलदार पारनेर यांच्याकडे मेल करून केली आहे.
कोविड रुग्ण व नातेवाईकाना जाहीर अहवान करतो कि उचपार सुरु असताना जर आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करत असेल तर ९८५०२६०४२४ या क्रमांकावर त्वरित संपर्क करा. मी व माझे सहकारी आपल्यासाठी उपलब्ध असतील.- अनिल शेटे
यावेळी संघटनेच्या ऑनलाईन मिटिंग मध्ये चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यावेळी चर्चेत अनिल शेटे, राजुभाउ लाळगे,नवशाद पठाण,राहुल शेटे,सचिन कोतकर,दत्ता टोनगे,गणेश चौधरी,विश्वास शेटे,नवनाथ लामखडे,शंकर पाटील वरखडे, नवनाथ बरशिले,एकनाथ शेटे,विकास गुंड,खंडु लामखडे,स्वप्नील लामखडे,अंकुश वरखडे,निलेश लामखडे,मच्छिंद्रनाथ लाळगे,निलेश वरखडे,किरण देशमुख,मगर आकाश,जयराम सरडे,सागर गोगाडे,राजेन्द्र वाळुंज,शांताराम पाडळे, मोरे रोहित,शेटे ऋषी,दरेकर निलेश,अंकुश वड्ने आदिनी चर्चेत सहभाग घेतला होता.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद