दूध दरवाढीबाबत १०० शेतकऱ्यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना "लेटर टु सीएम" मार्फत पाठवल्या.

0
पारनेर / चंद्रकांत कदम
पारनेर तालुक्यातील शेतकरी व शेतकरी संघटनांनी दुध दर वाढ व्हावी म्हणून १ ऑगस्ट 2020 रोजी गरजू लोकांना दूध वाटप करून दूध बंद आंदोलन केले होते. तरी सरकार दूध दरवाढीबाबत निष्काळजीपणा करत असल्याचे लक्षात येताच परत शेतकरी व शेतकरी संघटनांनी १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान दूध दरवाढीसंदर्भात आपल्या भावना मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे पाठवल्या आहेत.

यावेळी उत्तम पांढरे, रावसाहेब झंजाड, विनायक पांढरे, संदीप पांढरे,आबा खणसे, किरण झंजाड, कुंडलिक देंडगे, आनंदराव झंजाड, सुभाष पांढरे, ठकाराम खोडदे, नंदकुमार देंडगे, आयुब इनामदार, अक्षय झंजाड,  दादाभाऊ निमोणकर, आकाश खोडदे, अंबरनाथ खणसे, आप्पा झंजाड, चेतन खोडदे, राज खोडदे, श्रीपती खोडदे, विठ्ठल खणसे, शरद खोडदे, अजय भोर, अंकुश पांढरे, लहू पांढरे, गोटीराम झंजाड, मनोज तामखडे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मनोज तामखडे यांनी सांगितले की आम्ही नेहमीच शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शेतकरी नेते सुकाणु समिती महाराष्ट्र राज्य सदस्य माननीय श्री अनिलजी देठे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडण्याचे काम करत असतो शेतकरी सध्या शेतीमालाला व दुधाला भाव नसल्यामुळे पूर्णपणे हतबल झाला आहे.सध्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतीमालाचे पूर्णपणे नुकसान झाल्यामुळे व तीन ते चार महिन्यांपासून दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून पूर्णपणे हतबल झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल व मोडकळीस येईल. तरी आम्ही पत्राद्वारे आमच्या भावना आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असून याबाबत आपण लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी विनंती पारनेर तालुक्यातील गांजिभोयरे येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top