अलविदा रॉकी ! बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे दीर्घ आजाराने दुःखद निधन

0
बीड :  पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. रॉकी ने अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलात श्वानपथक महत्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण रॉकीने पूर्ण केले होते. रॉकी श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम केले आहे. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा बीड पोलीस दलाने गमावला असून त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील.अशा भावना व्यक्त करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रॉकीला श्रद्धांजली वाहिली.




Tags

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top