पारनेर : तालुक्यातील पिपळनेर येथे श्री.संत शिरोमणी सेना महाराज मंदिरामध्ये श्री. संत सेना महाराजांची पुण्यतिथी सोशल डिस्टन्सचे पालन करत पार पडली. पुण्यतिथी निमित्ताने पारनेर तालुका नाभिक संघटनेच्या उपस्थितीमध्ये श्री. संत शिरोमणी सेना महाराजांची आरती करून पुष्पांज़ली वाहण्यात आली. पिंपळनेर भजनी मंडळाच्या सहकार्याने भजन करण्यात आले. यावेळी पारनेर तालुका नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव आतकर, तालुकाध्यक्ष भाऊ बिडे, उपाध्यक्ष शाम साळुंके, सचिव विनायक कुटे, सहसचिव सुनील आतकर ,कार्याध्यक्ष नवनाथ राऊत, पारनेर तालुका युवक अध्यक्ष प्रसाद भोसले, राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे तालुका अध्यक्ष मुरली आतकर, भाऊसाहेब सोनवणे, धनंजय सोनावणे, दत्ता सोनवणे, मच्छिन्द्र वाघमारे, प्रमोद सोनवणे, संजय वाघचौरे (मेजर ),प्रवीण राऊत, स्वपनिल राऊत, मनोहर राऊत, गणेश खंडाळे, संदीप खंडाळे, गोरक्ष शिंदे (सर )आदी समाज बांधव उपस्थिती होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद