पारनेर : पिंपरी जलसेन गावचे सुपुत्र नायक भरत कदम शहीद.....

0
पारनेर : तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे प्रात्यक्षिक करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत पावले आहेत.

भरत कदम हे २००३ पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मी मध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी दैनंदिन मॉर्निंग बिपिटी करत असताना अचानक भरत यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना जवळच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये व नंतर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी रविवारी सकाळी ११:३० वाजता पिंपरी जलसेन येथे त्यांच्या मूळ गावी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top