प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ५३ घरकुले मंजूर - सभापती गणेश शेळके

0
पारनेर : पारनेर तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षामध्ये एकूण २२० घरकुले मंजूर झाल्याचे सभापती गणेश शेळके यांनी सांगितले. एकूण सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोनशे घरकुले अल्पसंख्यांकांसाठी १, एसटीसाठी १६, एस सी साठी ४ असे एकूण २२१ घरकुले मंजूर झाल्याचे सांगितले. पैकी आज ५३ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. हे प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये चे अनुदान त्यांच्या खात्यावर ज्या पद्धतीने बांधकाम होईल त्या पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. एकूण ६३ लाख ६० हजार रुपये लाभ घरकुल लाभार्थ्यांना होणार असल्याचे सभापती गणेश शेळके यांनी सांगितले. 

पुढील काळामध्ये जास्तीत जास्त गोरगरीब जनतेसाठी घरकुले मंजूर करणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस असल्याचे गणेश शेळके यांनी सांगितले. या योजनेमध्ये ते प्रत्यक्षात लाभार्थ्याच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहेत.-सभापती गणेश शेळके 

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top