निघोज येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत नवव्या महिन्यातील गरोदर मातांना बेबी केअर किटचे वाटप

0
पारनेर :  तालुक्यातील निघोज येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पारनेर अंतर्गत नवव्या महिन्यातील गरोदर मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.
निघोज बिट अंतर्गत असणाऱ्या अंगणवाडी वाजेवाडी, वडनेर बु., शिवडी, शिरसुले, काळेवस्ती, बोदगेवाडी, सरडेवस्ती, देवीभोयरे या अंगणवाडी परिक्षेत्रातील पहिल्या खेपेच्या नववा महिना चालू असलेल्या गरोदर मातांना तसेच पहिल्या खेपेच्या स्तनदा मातांना शासनामार्फत मिळालेल्या बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. बेबी केअर किटचे वाटप करताना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. सदर किट मध्ये नवजात बालक व स्तनदा मातेसाठी उपयोगी असणारे साहित्य असतात. शासनाच्या या योजनेला लाभार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेबी केअर किट वाटप करताना निघोज गटातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका मोठया संख्येने उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top