अहमदनगर : माजी आमदार अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

0
अहमदनगर: माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी,  एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.

अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top