पारनेर : माहीती तंत्रज्ञान विभागाचे राज्यप्रमुख म्हणून जितेश सरडे यांची निवड

0
राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे पदाधिकारी जाहिर....
पारनेर : तालुक्यातील देवीभोयरे येथील रहिवासी जितेश सरडे यांची राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्याचे अध्यक्ष म्हणून शुक्रवारी मुंबईत घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्या माहीती तंत्रज्ञान विभागाच्या राज्याच्या प्रमुखपदाच्या नियुक्तीचे पत्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांनी जितेश सरडे यांना सुपूर्द केले. यावेळी जयंत पाटील, मेहेबूब शेख आदी उपस्थित होते.

सरडे यांच्या नियुक्तीमुळे आमदार नीलेश लंके यांचे राज्यपातळीवरील महत्व आधोरेखीत झाले असून तालुक्यातील व्यक्तीला सरडे यांच्या रूपाने राज्य पातळीवर काम करण्याची प्रथमच संधी मिळाली आहे.शिवव्याख्याते म्हणून परिचित असलेले जितेश सरडे यांनी विधानसभा निवडणूकीत आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारसभा गाजविल्या असून त्याच वेळी राज्य पातळीवरील नेतृत्वाने त्यांच्या वकृत्वाची दखल घेतली होती.राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुतोवाच केले होते. राज्यात आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सरडे यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी देण्यासंदर्भात हालचालीही सुरू झाल्या होत्या. परंतू कोरोनो विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमिवर विदयार्थी काँग्रेस पदाधिकारी निवडी लांबणीवर पडल्या होत्या. अलिकडेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून सरडे यांना दोनदा मुलाखतीसाठी मुंबईत बोलविण्यात आले होते. दोन्ही मुलाखतींमध्ये सरडे यांनी आपले वेगळेपण सिद्ध करीत प्रदेशाध्यक्ष पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख, विदयार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांना प्रभावित केले होते.
गुरूवारी रात्री सरडे यांच्याशी संपर्क करण्यात येउन शुक्रवारी होणा-या राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीसाठी आमंत्रीत करण्यात आले होते. राष्ट्रवादी भवनामध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पार पडलेल्या या बैठकीत विभागवार  आढावा घेण्यात येउन विविध पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात सरडे यांच्यावर माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आदीती तटकरे, सोनिया दुहन, मेहेबूब शेख हे पदाधिकारी तर जितेश सरडे यांच्यासमवेत अ‍ॅड. राहुल झावरे, सरपंच अरूण पवार, संदीप चौधरी, राहुल थोरात, सचिन कणसे हे स्थानिक कायकर्ते उपस्थित होते.

चौकट 

दिलेल्या संधीचे सोनं करणारआमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून राज्य पातळीवर काम करण्याची पक्षाने दिलेल्या संधीचे सोनं करील असे सरडे यांनी नियुक्तीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. माहीती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहचविण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top