ऑनलाईन शाळा कोल्हापूर, नगर जिल्हयात प्रायोगिक तत्वावर...

0
मंत्रालयातील बैठकीत निर्णय आमदार निलेश लंके यांची माहीती...
पारनेर: आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ऑनलाईन शाळा उपक्रम नगर जिल्हयासह कोल्हापूर जिल्हयात प्रायोगिक पातळीवर राबविण्याचा निर्णय मंगळवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
लॉकडानमुळे गेल्या मार्च महिन्यापासून विदयार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावर मात करण्यासाठी बहुतांश शिक्षकांनी हॉटस् अ‍ॅपचा आधार घेत विदयार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सोशल मिडीयाच्या या माध्यमास अनेक बंधने असल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यास केला का ? शिक्षकांनी दिलेल्या धडयांचे विदयार्थ्यांना आकलन झाले का ? याबाबत अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नेमका कधी आटोक्यात येणार याबाबत निश्‍चित कालमर्यादा नसल्याने घरी बसलेल्या विदयार्थ्यांना योग्य पद्धतीने ऑनलाईन शिक्षण मिळावे ही संकल्पना आ.निलेश लंके यांनी मांडली. तंत्रस्नेही शिक्षक व दिप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप गुंड यांच्या मदतीने ऑनलाईन शाळेसाठी खास सॉफटवेअर तयार करण्यात आले. दोन महिने सर्व बारीक सारीक गोष्टींवर सुक्ष्म अभ्यास करून विदयार्थी व शिक्षकांसाठी सुटसुटीत सॉफटवेअरची निर्मीती करण्यात आली.
पारनेर : ऑनलाईन शाळेचा उपक्रम राबविण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. 

या सॉफटवेअरचे प्रशिक्षण पारनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना देण्यात आल्यानंतर गेल्या आठवडयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या सॉफटवेअरचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. पवार यांनी या सॉफटवेअरची माहीती घेउन शिक्षण तज्ञांसोबत चर्चा करतानाच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांंनीही या उपक्रमाची माहीती घेउन राज्यातील विदयार्थ्यांसाठी त्याचा उपयोग करता येईल का हे तपासण्याच्या सुचना दिल्या होत्या. गेल्याच आठवडयात राळेगणसिद्धी येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील या उपक्रमाचे उद्घाटन केले होते. त्याच वेळी राज्यात उपक्रम राबविण्यासंदर्भात दि. 28 रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी जाहिर केले होते. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुर्श्रीफ, आमदार निलेश लंके, ग्रामविकास, नियोजन व वित्त विभाग यांचे अप्पर मुख्य सचिव, शिक्षण विभागाचे आयुक्त, नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत एक तास बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री तसेच अधिकारी यांना या उपक्रमाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मंत्री, आमदार, तंत्रस्नेही शिक्षक तसेच अधिकारी यांच्यातील चर्चेनंतर नगरसह कोल्हापूर जिल्हयामध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही जिल्हयातील शिक्षणाचा आढावा घेण्यात आल्यानंतर हा उपक्रम राज्यात राबविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
पारनेरचा पॅटर्न कोल्हापूरात !
विविध बाबींमध्ये वेगळेपण जपणा-या कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षणातील पारनेर पॅटर्न राबविण्यात येणार असल्याने पारनेरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे संदीप गुंड यांनी सांगितले. आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून पारनेरचे नाव कोल्हापूरमध्ये झळकणार असल्याचेही गुंड म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top