पारनेर: न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,पारनेर या विदयालयाची निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

0
पारनेर -(प्रतिनिधी : रवी कावरे): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विदयालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत विदयालयाचा इ.१०वी (एस.एस.सी.परीक्षा मार्च 2020) निकाल 99.16 टक्के लागला आहे. 

या निकालाचा तपशील पुढीलप्रमाणे....    1)परीक्षेला बसलेले विद्यार्थी -239          2)उत्तीर्ण विद्यार्थी-237                          3)विशेष श्रेणी मिळविणारे विद्यार्थी - 123                                                  4) प्रथम श्रेणी मिळविणारे विद्यार्थी - 87  5)द्वितीय श्रेणी मिळविणारे विद्यार्थी - 26  6) तृतीय श्रेणी मिळविणारे विद्यार्थी - O1  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. नंदकुमारजी झावरे साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.रामचंद्रजी दरे साहेब,सचिव मा.श्री.जी.डी.खानदेशे साहेब,जेष्ठ विश्वस्त मा.श्री. सितारामजी खिलारी सर, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री.राहूलभैय्या झावरे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री.मुकुंद जासुद सर, उपप्राचार्य श्री.संजय कुसकर,ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक श्री.बाळासाहेब करंजुले,पर्यवेक्षक श्री.सुनील वाव्हळ,जेष्ठ शिक्षक श्री. बापूराव होळकर यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक,यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top