आदर्श शिक्षक पुरस्काराने मुंबईत पारनेर तालुक्याचा बहुमान - आ. लंके

0

 पारनेर : नवी मुंबईतील सानपाडा विभागात पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील रहिवाशी, एक आदर्श शिक्षक, उत्तम वक्ता  श्री. भाऊसाहेब रामभाऊ आहेर हे मुबई महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून गेली 26 वर्षे कार्यरत आहेत. आहेर यांनी शिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुंबईत शिक्षण विभागाने त्यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार भायखळा येथील वीर जिजामाता  उद्यानातील पेंग्विन हॉल मध्ये मा. महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, मेडल आणि रोख रक्कम रुपये 10, 000 हजार देऊन प्रदान करण्यात आला.


मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर ,उपमहापौर श्री. सुहास वाडकर ,माजी महापौर श्रद्धा जाधव शिक्षण समिती अध्यक्षा सौ. संध्या सकरे मॅडम  व अंजली नाईक मॅडम, शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर , विभाग निरीक्षक श्री. किसनराव पावडे 


या पुरस्काराबद्दल पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सरांचे कौतुक केले. व  हा पुरस्कार म्हणजे पारनेर तालुक्याला मिळालेला बहुमान आहे असे सांगितले. 

या पुरस्कारा वेळी उपमहापौर ऍड सुहास वाडकर ,माजी महापौर श्रद्धा जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा सौ. संध्या सकरे, अंजली नाईक, शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर,विभाग निरीक्षक श्री किसनराव पावडे उपस्थित होते. या वेळी शिक्षण विभागातील शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पारनेरचे व पळसपूर गावच्या तमाम नागरिकांचे आणि भाऊसाहेब रामभाऊ आहेर सरांचे मनपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुरस्काराबद्दल पळसपूर येथील मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले व सर्व स्तरातून या कामगिरीबद्दल पारनेर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top