पारनेर: (वार्ताहर-अविनाश भांबरे) पारनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात सक्रिय व बहुचर्चित म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे दिनांक २३/१२/२०२० पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. नवीन उमेदवार तर पूर्ण ताकतीने मतदारांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे गुप्त बैठकांनी चांगलाच तो जोर धरला आहे. ग्रामपंचायत मध्ये एकूण चार वार्ड आहेत. एकूण जागा अकरा आहेत. सर्व जागांची वार्ड निहाय आरक्षण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे. वार्ड क्रमांक एक मध्ये एकुण मतदार ८४१ असून त्यामध्ये दोन सर्वसाधारण महिला एक सर्वसाधारण पुरुष आहे. वार्ड क्रमांक दोन मध्ये एकूण ६९४ मतदार असून एक सर्वसाधारण पुरुष एक ओबीसी महिला एक ओबीसी पुरुष आहे. वार्ड क्रमांक ३ मध्ये ५४४ मतदार असून एक सर्वसाधारण पुरुष तर
एक सर्वसाधारण महिला आहे. वार्ड क्रमांक ४ मध्ये ६५४ वर असून एक सर्वसाधारण पुरुष एक ओबीसी महिला एक सर्वसाधारण महिला आहे. असे एकूण सहा महिला व पाच पुरुष उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. येत्या बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत असून फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक ३०/१२/२० आहे. ३१/१२/२० रोजी अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतरच खरे निवडणुकीच्या रणधुमाळीची मजा मतदारांना चाखता येणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद