गोलेगाव येथील नाईकरे वस्ती येथे आढळला 8 फुटी अजगर

0

शिरूर :  गोलेगाव येथील नाईकरे वस्ती येथे आठ फुटी अजगर आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशोक नवले हे रात्री दहा वाजेच्या सुमारास घराबाहेर आले असता त्यांना शेजारील झुडुपामध्ये काहीतरी हालचाल होत आल्याचा आवाज आला. बॅटरी लावून पाहिले असता त्यांना मोठा साप दिसला. पाहताचक्षणी हा घोणस विषारी साप आल्याचे त्यांना वाटल्याने त्यांनी शिरूर येथील सर्पमित्र निलेश पाठक यांना फोन करून याविषयी माहिती दिली असता. सर्पमित्र पाठक व सर्पमित्र समीर शहा आणि वनविभाग अधिकारी मनोहर म्हैसेकर हे घटनास्थळी दाखल झाले.  त्यांना पाहणी दरम्यान लक्षात आले की तो साप घोणस नसून मोठा अजगर आहे. व त्याची लांबी ही आठ फूट लांब होती. एवढा मोठा अजगर पाहून सर्पमित्र व वनविभाग अधिकारी आश्चर्य चकित झाले. कारण शिरूर सारख्या ठिकाणी एवढा मोठा अजगर याआधी कधी सापडला नव्हता किंवा निदर्शनात आलाही नव्हता. असे सर्पमित्र पाठक यांनी सांगितले. त्यानंतर सर्पमित्र निलेश पाठक व सर्पमित्र समीर शहा यांनी अजगरास  शिताफीने पकडून वनविभाग कार्यालय शिरूर येथे पंचनामा करण्यासाठी नेले असता शिरूरचे वनविभाग अधिकारी मनोहर म्हैसकर यांनी अजगरची पाहणी केली व त्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.




साप दिसल्यास त्याला ना डीवचता त्याला न मारता लक्ष ठेवा व सर्पमित्र यांना फोन करून माहिती द्या व बोलवा असे आवाहन सर्पमित्र निलेश पाठक व सर्पमित्र समीर यांनी केले आहे .तर सापाला न मारता त्याला जीवदान दिल्याबद्दल लोकांचे आभारही त्यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top