पारनेर: शिवबा संघटना व प्रहारच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.कोरोनामुळे बससेवा बंद होत्या त्यामुळे निघोज व परीसरातील विदयार्थी व ग्रामस्थांचे हाल होत होते. यासंदर्भात वारवार मागणी करण्यात येत होती. मात्र प्रशासन त्याकडे साफ दुर्लक्ष करत होते.
त्यामुळे शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पारनेर आगार प्रशासनास यासंदर्भात निवेदन देऊन कोणत्याही क्षणी आंदोलनाचा इशारा दिला असता. प्रशासनाने तात्काळ दखल घेत बससेवा सुरु केली. त्याबद्दल प्रभारी व्यवस्थापक करपे साहेब यांचे शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यानी आभार मानले.
त्याचप्रमाणे बस चालु होण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे, प्रहार जिल्हाप्रमुख विनोदभैया परदेशी, निघोज चे माजी सरपंच ठकाराम लंके,रमेश वरखडे, मा.जिल्हा परीषद उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, सभापती तथा संचालक जिल्हा बॅंक मा. प्रशांतजी गायकवाड, विश्वनाथदादा कोरडे आदी नेतेमंडळी चे सहकार्य लाभले त्यांचे ही शिवबा व प्रहारच्या वतीने आभार मानण्यात आले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद