पारनेर: तालुक्यातील महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि राज्यस्तरीय 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा या देवस्थानला अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी भेट दिली. तर त्यांच्या समवेत श्रीगोंदा- पारनेर विभागाचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले हेही उपस्थित होते.
डॉ. भोसले यांनी मुख्य मंदिरातील खंडोबाची स्वयंभू मूर्ती व त्यापुढील स्वयंभू १२ लिंगाचे मनोभावे दर्शन घेऊन देवस्थान परिसर पाहणी केली. देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड यांनी देवस्थानच्या विकास कामांची तसेच देवस्थानचे पौराणिक महात्म आणि प. पु. गगनगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते देवस्थानचा झालेला सन (१९९७ साली) जीर्णोद्धार याविषयी माहिती सांगितली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले कोरठणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपदन करून जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व इतरांनी भाकरी भाजी चे प्रसाद भोजन घेतले.
याप्रसंगी मंडळ अधिकारी सचिन पोटे व दीपक कदम, गोपी घुले, गारगुंडी उपसरपंच प्रशांत झावरे, पुजारी विकास व दत्तात्रय क्षीरसागर, व्यवस्थापक भाऊसाहेब पुंडे, विक्रम ठोमे, समाधान पुंडे, अमोल ठोमे, सुखदेव गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद