पारनेर: तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचे यापूर्वी दुसऱ्यांनी भूमिपूजन केले मग काम का सुरू झाले नाही ? असा सवाल करतानाच आपण काम करणारा माणूस असून ज्या दिवशी भूमिपूजन करतो त्या दिवशीच कामाची सुरुवातही होते असा उपरोधिक टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.
जिल्हा परिषद सदस्य सुप्रियाताई झावरे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या वीस लाख 50 हजार रुपयांचा तीन शाळा खोल्यांचे भूमिपूजन सुजित पाटील झावरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या आधी सुमारे 9 महिन्यांपूर्वी याच शाळा खोल्यांचे भूमिपूजन आमदार निलेश लंके यांनी केले होते. याविषयी पत्रकारांनी छेडले असता झावरे पाटील यांनी उपरोधिक टोला लगावला .
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले,सरपंच लिलाबाई रोहोकले, माजी सरपंच ठकचंद रोहोकले,बबन चेमटे,बबनराव डावखर,चेअरमन लक्ष्मण रोहोकले,माजी चेअरमन गंगाधर रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे सुलतानभाई शेख, संदिप कपाळे, भागूजी रोहोकले, मुख्याध्यापक श्रीपती आबुज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चेमटे आदी यावेळी उपस्थित होते.
झावरे पाटील परिवाराचे भाळवणी गावावर विशेष प्रेम आहे. यापूर्वी देखील आपण या गावासाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची पाणी योजना राबविली आहे. लवकरच पंधरा लाख रुपये खर्चाच्या माळवाडी रस्त्याच्या कामाची सुरुवात करणार आहे.- सुजित झावरे पाटील
या शाळा खोल्यांमुळे भाळवणीच्या वैभवात भर पडणार असल्याचे सांगताना आगामी काळातही या गावासाठी विविध विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगत आपल्यात मातोश्री सुप्रियाताई झावरे पाटील या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत त्यांच्या प्रयत्नानेच या शाळा खोल्या मंजूर झाल्याचा पुनरुच्चार करीत शैक्षणीक कामात आपणास राजकिय टिका करणार नसून मी बोललो की, सगळे मलाच 'टारगेट' करतात असेही सुजित पाटील म्हणाले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद