पारनेर : तालुक्यातील निघोज येथील अहमदनगर जिल्हा परिषद १५ वित्त आयोग २०२०-२१ मधून जिल्हा परिषद सदस्या पुष्पा वराळ यांच्या प्रयत्नातून निघोज, ढवळेमळा येथे खार ओढ्यावर सी.डी. वर्क या दोन लाख रूपयांच्या कामाचे भूमीपूजन बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा आण्णा वरखडे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चित्रा वराळ होत्या.
यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, मंगेश वराळ, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रमेश ढवळे, रंगनाथ वराळ, गवराम लंके, रावसाहेब वराळ, भीमा लामखडे, मंगेश लाळगे, पोपट लंके, दत्ता घोगरे, उत्तम लामखडे, संतोष वरखडे, आप्पा वराळ, अस्लमभाई इनामदार, प्रतिक वरखडे, गजानन ठुबे, गजानन वराळ, साजिद तांबोळी, गणेश लंके, माऊली ढवळे, प्रतीक वरखडे, अमीर शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ यावेळी म्हणाले, जिल्हा परिषदच्या माध्यमातून गेली चार वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली असून यामध्ये शेतकर्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी जिल्हा परिषद माध्यमातून अनेक ठिकाणी छोटी मोठी केटी वेअर बंधारे बांधण्यात आली आहेत. यामाध्यमातून शेतीचा तसेच वाडीवस्तीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न असून खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, आमदार निलेश लंके यांच्या पाठबळाने मोठी विकासकामे मार्गी लावणार आहे.- सचिन वराळ पाटील
News Maharashtra Darshan
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद