पारनेर: येथे अहमदनगर जिल्ह्याचे खासदार लोकनेते दिलीपजी गांधी यांना पारनेर तालुका सर्व पक्षाचा वतीने श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पारनेर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी बाजार समिती येथील आनंद लॉन या ठिकाणी उपस्थित राहून पुष्पांजली अर्पण केली. यावेळी आलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी दिलीपजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आपल्या आयुष्यात दिलीप गांधी यांच्यासोबत असताना जे अनुभव आले ते सर्वपुढे मांडले.
माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांनी आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याला निराश केले नाही सर्वाना समान मानले.- भाजप पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंतदादा चेडे
त्यानंतर भाजप चे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, जेष्ठ कार्यकर्ते सभाजीराव गायकवाड, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकलेे सर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कोल्हे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, शंकर नगरे, सुपा उपसरपंच सागर मेड तसेच पारनेर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद