पारनेर : तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री.क्षेत्र कोरठण खंडोबा येथील भक्तीनिवस मध्ये ३०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या तीनशेच्या वर गेली असून दिवसेंदिवस ती संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दोन दिवसापूर्वीच या बैठकीत कोरोना सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. लोंढे यांच्या मदतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी ३०० बेडचे कोविड सेंटर पिंपळगाव येथील कोरठण खंडोबा देवस्थानच्या भक्तनिवास येथे सुरू केले आहे.
पिंपळगाव रोठा येथील श्री.क्षेत्र कोरठण खंडोबा येथील भक्तीनिवस मध्ये ३०० बेडचे कोविड सेंटर सुरू
मार्च २४, २०२१
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद