पारनेर: तालुक्यातील भाळवणी येथील माळवाडीतील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामाचे स्वरूप माळवाडी ते भाळवणी असे असून यासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे आता माळवाडीकरांचा रोजचा जाण्यायेण्याचा रस्ता व्यवस्थित होणार असल्याने माळवाडीकरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.
माळवाडी येथील ग्रामस्थांनी दळणवळण करण्यासाठी अनेक वेळा या रस्त्याची मागणी केली होती. मात्र निधी उपलब्ध नसल्याने हे काम सुरू करता येत नव्हते आता निधी उपलब्ध झाल्यामुळे माळवाडी येथील या रस्त्याचे काम सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ आज केला आहे.- सुजीत झावरे पाटील(जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष)
या उद्घाटन प्रसंगी सरपंच सौ.लिलाबाई रोहोकले, शिवसेना तालुका अध्यक्ष विकास रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, चेअरमन मंजाबापू रोहोकले, पंढरीनाथ रोहोकले, संदीप कपाळे, ठकचंद रोहोकले, ग्रा.प. सदस्य भागूजी दादा रोहोकले, सिताराम रोहोकले, स्वप्नील राहिंज, रमेश रोहोकले, रावसाहेब रोहोकले, मा. चेअरमन गंगाधर रोहोकले, बबनराव चेमटे, ज्ञानदेव माऊली, बबनराव डावखर, डी.वाय. सर, राजेंद्र रोहोकले, सुखदेव रोहोकले सर, आप्पा दादा रोहोकले, कानिफ मुळके, निशिकांत रोहोकले, सचिन रोहोकले, अभिजित रोहोकले, अरुण रोहोकले, बाबासाहेब आंबेडकर, संजय रोहोकले, प्रवीण रोहोकले तसेच माळवाडी परीसरातील युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
भाळवणी येथील माळवाडीतील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.(News महाराष्ट्र दर्शन) |
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद