पारनेर: (News महाराष्ट्र दर्शन) (प्रतिनिधी- निलेश जाधव) तालुक्यातील नागापुरवाडीच्या डुबेवाडी येथे होणाऱ्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांन विरोधात बुधवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ७० ते ८० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. तसेच एक पोकलेन मशीन व दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहेत. हा सर्व एकूण ४० ते ५० लाखांचा अवैध वाळु साठा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या कारवाईमुळे वाळुतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर वृत्त, तालुक्यातील नागापुरवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व उपसा केला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी डूबेवाडी येथे अवैधरित्या पोकलेन मशिनच्या साह्याने वाळू काढली जात होती. कारवाईमध्ये पोकलेन मशीन तसेच दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. हे सर्व वाहने वैभव उर्फ बाल्या बाळकृष्ण पायमोडे ( रा. टाकळी ढोकेश्वर ) याचे असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व नायब तहसीलदार माळवे यांनी ही कारवाई केली. संबंधित वाहने पंचनामा करून पारनेर पोलिस ठाण्यात आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पथकामध्ये पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, नायब तहसीलदार एम.ए.माळवे, सलगरे कामगार तलाठी शिरसाठ, एरंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे आदींचा समावेश होता. या पोलिस व महसूलच्या कारवाईचा मात्र वाळु तस्करांनी मोठा धसका घेतला आहे.
https://www.mdnewsmarathi.com/?m=1
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद