गांजीभोयरेत पक्षांसाठी चारा पाणी व्यवस्था

0

गांजीभोयरे:-  सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. उष्णता एवढी वाढली आहे की आता सर्व जण कुठे तरी मस्त अशी गार सावलीची अपेक्षा करताना दिसत आहे. अशी माणसांची अवस्था झाली असून तिथे प्राणी आणि पक्षांची काय अवस्था असेल याची मात्र कल्पना केली तरी अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या शेतीमधील धान्य पिकाची काढणी होवुन गेली असल्यामुळे वन्य पक्षांना खाण्यासाठी खाद्य उपलब्ध नसल्याने चाऱ्यासाठीची भटकंती वाढली आहे. सद्य परिस्थिती मध्ये ओढे, नाले, तलावातील पाणी आटल्यामुळे पक्षांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. 

वन्य पक्षांचा चारा पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन युवा ग्रामविकास प्रतिष्ठाण गांजीभोयरे ही सामाजीक काम करणारी संस्था पक्षांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावली आहे. प्रतिष्ठाणने गावांमधील शाळा, मंदिर परिसरात पक्षांसाठी खास व्यवस्था केली आहे. यावेळी सुरेश खोडदे, शब्बीर शेख, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पांढरे, उत्तम पांढरे, निवृत्ती पांढरे, अमित पांढरे, बापु पांढरे, कल्पनाताई गिरी, गफुर शेख, गौरी तामखडे, आनंद तामखडे आदी उपस्थित होते. 

युवा ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध उपक्रम नेहमीच राबवले जात असुन लवकरच वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन असुन युवकांनीही शक्य होईल त्या ठिकाणी वन्यप्राण्यांची पाण्यावाचुन होत असलेली परवड थांबण्यासाठी आपल्या शेतामधील बोरवेल, विहीर किंवा जसं शक्य होईल तसे पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज तामखडे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top