आंतरविद्याशाखीय शिक्षण काळाची गरज - डॉ. बाळासाहेब सागडे
पारनेर: तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने फॅकल्टी इंनरिचमेंट प्रोग्राम, कम्युनिकेशन स्किल फॉर प्रोफेशनल या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते. हा अभ्यासक्रम ८ मार्च २०२१ ते १५ मार्च २०२१ या कालावधीत राबविण्यात आला आहे.
आंतर विद्याशाखेत सर्वांना सर्व विषय शिकता आले पहिजे व आपले कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे कारण आंतरविद्याशाखीय शिक्षण आज काळाची गरज आहे. इंग्रजी भाषा आत्मसात करताना माध्यमे महत्वाची भूमिका बजावतात- डॉ. बाळासाहेब सागडे
इंग्रजी भाषा दैनंदिन वापराने इंग्रजी भाषेबद्दल भीती दूर होईल असे सांगितले तसेच महाविद्यालय नॅक मुल्यांकनासाठी सज्ज आहे.- प्राचार्य डॉ. सहदेव आहेर
या कार्यशाळाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मनोहर एरंडे, प्रा. राम खोडदे, प्रा.विशाल रोकडे, प्रा. अंजली मेहेर, प्रा.संगीता मांडगे, प्रा. दिपाली जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या अभ्यासक्रमासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व नामवंत प्राध्यापकांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी इंग्रजी भाषेचे संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी व्यक्तिमत्व, निर्णयक्षमता, नाविन्य, लक्ष, नवीन आव्हाने, तांत्रिक कौशल्य विकसित करणे काळाची गरज आहे कारण कौशल्य आत्मसात केल्याने मानवाचे व्यक्तिमत्त्व विकसित होऊन माणूस परिपूर्ण होतो असे सांगितले. प्रा. अशोक मोरे यांनी इंग्रजी भाषा आत्मसात करताना वाक्य रचना कशी करावी याचे महत्व सांगितले.
प्रा. अनिल चिंधे यांनी रोजच्या वापरातील इंग्रजी भाषा तसेच व्याकरणदृष्ट्या इंग्रजी या दोन्ही पद्धतींचा सुवर्णमध्य साधत इंग्रजी भाषा कशी बोलावी या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रा. मनीषा आढाव यांनी संभाषण कौशल्य व समुह चर्चा भाषा संप्रेषण प्रक्रिया, अनुवाद या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. अनिल काळे यांनी यांनी इंग्रजी भाषेतील व्यवसायाच्या संधी. तर प्रा. आनंद पाटेकर यांनी इंग्रजी भाषा या विषयावर माहिती सांगितली.
या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.स्वाती मोरे, प्रा. आनंद पाटेकर तसेच समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रा. मनीषा गाडीलकर, प्रा. प्रीती कार्ले, प्रा. पोपट सुंबरे, प्रा.जनाबाई घेमुड, प्रा. विशाल चव्हाण यांनी नियोजन केले होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्वाती मोरे, पाहुणे परिचय प्रा. सचिन निघूट यांनी केले सूत्रसंचालन प्रा. मनीषा गाडीलकर तर आभार या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. आनंद पाटेकर यांनी मांडले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद