वडझिरे, चिंचोली हद्दीतील डुम्या डोंगराला लागलेली आग स्थानिक तरुणांच्या मदतीने आग विझविण्यात वनविभागाला यश

0
पारनेर: तालुक्यातील चिंचोली,वडझिरे परीसरातील डुम्या डोंगराला गुरुवारी रात्री ७:३० चे दरम्यान भिषण आग लागली होती. यावेळी स्थानिक तरुणांनी वनविभागाला या घटनेची माहीती देताच वडझिरेचे वनरक्षक उमेश खराडे, चिंचोलीच्या वनरक्षक अश्विनी सोळंकी, अळकुटीचे वनरक्षक हरीभाऊ आठरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. डुम्या डोंगरा पासुन माचाळी ते गणपतीमंदीर तसेच, हांडे, भगतवस्ती ते मळगंगा मंदीर चिंचोलीच्या दिशेला आग लागली होती.आगीमधे काही प्रमाणात झाडे जळाली असुन, जिवजंतुंचा मृत्यु झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग विझवण्यासाठी चिंचोली, पिंपरीजलसेन, वडझिरे येथील युवकांनी जिव धोक्यात घालत वनविभागाला सहकार्य केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तब्बल ६ तासांनंतर डोंगरावरील आग विझविण्यामधे वनविभागाला यश आले. साधारणत: २५ ते ३० हेक्टर परीसराला आग लागली होती. आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही.
आगीचे वृत्त समजताच माझ्यासह चिंचोलीच्या वनरक्षक अश्विनी सोळंकी, अळकुटीचे वनरक्षक हरीभाऊ आठरें आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा तेथील आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आम्हाला आग विझविण्यासाठी वडझिरे, चिंचोली, पिंपरीजलसेन, येथील स्थानिक तरुणांनी मोलाची साथ दिली त्यांचे आम्ही आभार मानतो- वनरक्षक उमेश खराडे 

आग विझविण्यासाठी राज्य मराठी पत्रकारसंघाचे जिल्हासचिव व पारनेरचे तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, अनुज एरंडे, पिंपरी जलसेन येथुन सागर वाढवणे, सागर काळे, विठ्ठल वाढवणे, ऋषिकेश काळे, कुणाल काळे, चिंचोली येथुन भागचंद कातोरे, जनार्दन घोरपडे, सुरेश सातपुते, अशोक झंजाड आदींनी वन विभागाला मोलाची मदत केली. सहा तासामधे आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला असुन पारनेर परिसरामधुन स्थानिक तरुण, पत्रकार व वनविभागाचे कौतुक होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top