निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न - वसंत कवाद.

0

निघोज प्रतिनिधी - निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २७ / ०३ /२०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता संस्थेचे चेअरमन मा श्री.वसंत बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या संक्रमणामुळे ऑनलाईन व्ही. सी. / ओ.ए.व्ही एम द्वारे संपन्न झाली. सभेला सुरुवात होण्याच्या अगोदर लक्ष्मी मातेचे व स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन कन्हैया उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री शांताराम मामा लंके, माजी सरपंच श्री. ठकाराम लंके, अध्यक्ष श्री. वसंत कवाद, व्हा. चेअरमन नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, श्री. राजाराम  कवाद यांच्या हस्ते करण्यात आले .

अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, ठेवीदार हितचिंतक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . यानंतर सभेला सुरुवात करुन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील वर्षीच्या वार्षिक सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले . या सभेच्या अजेंठा वरती असणारे सर्व विषय एक मताने मंजुर करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. श्री वसंत कवाद यांनी दि. ३१ / ०३ / २०२० अखेरच्या संचालक मंडळाने सादर केलेल्या वार्षिक ताळेबंद व नफा - तोटा अहवालाचे वाचन केले .

यावेळी अहवालात सालात पतसंस्थेचा ठेवीमध्ये ४२ कोटी ४० लाखाची वाढ होऊन संस्थेच्या ३१ मार्च २०२० अखेर संस्थेच्या १४४ कोटी ९५ लाख ठेवीचा टप्पा पार केला. संस्थेचे कर्जवाटप  ७१ कोटी ८२ लाख , गुंतवणूक ९५ कोटी ३४ लाख, मालमत्ता २ कोटी ५५ लाख, निधी १७ कोटी ४४ लाख, नफा २ कोटी ९५ लाख झालेला असुन  सभासदांना १२ टक्के लाभांश दिल्याची माहीती अध्यक्षांनी दिली. संस्थेचे संचालक श्री अॅड. बाळासाहेब लामखडे यांनी संस्थेच्या सभासदांच्या मागणीनुसार पतसंस्थेस स्व. श्री बाबासाहेब कवाद यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर करण्यात यावा असा ठराव मांडण्यात आला त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, दामुशेठ लंके, बहिरु कळसकर, भिवाशेठ रसाळ, पंढरीनाथ साळवे, सिदू कऱ्हे,  शांताराम कळसकर, अॅड सुनिल मेसे, संचालिका सौ लताबाई कवाद, सौ. वैशाली कवाद उपस्थित होते. तसेच संस्थेचे सभासद ठकाराम लंके, रामदास वरखडे, रामदास कवाद, निवृत्ती महाराज तनपुरे यांनी संस्थेने २३ वर्षात केलेल्या चांगल्या कामाच्या माहीतीचा आलेख व संस्थेच्या कामकाजाविषयी मनोगते व्यक्त केली. संस्थेने खातेदारासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या बद्दल संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी मोठ्या संख्येने सभासदांनी ऑनलाईन उपस्थिती दाखविली. सभेच्या ठिकाणी निघोज वि.का.सेवा सोसायटीचे व्हा चेअरमन श्री ज्ञानदेव भांबरे, संदीप रसाळ, खंडू लामखडे, खंडू इधाटे, दत्तात्रय कुदळे इत्यादी मान्यवर व संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top