पारनेर: तालुक्यातील वडनेर बु येथे माननीय नामदार विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली वाजेवाडी येथे कोल्हापूर पद्धतीचा १५ लाख रुपयांचा पाणी साठा बंधारा तसेच १३ लाख ५० हजार रुपयांचे स्मशानभूमीचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी बांधकाम समिती व कृषी समिती सभापती काशीनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, शिवसेनाचे युवासेना प्रमुख नितीन शेळके या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
शिवसेनेचे पदाधिकारी दिलेला शब्द नेहमी पाळतात. वाजेवाडी येथील ग्रामस्थांनी जी मागणी केली होती ती बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी आपल्या वार्षिक योजने अंतर्गत पूर्ण केली आहेत. तसेच येणाऱ्या काळात जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके हे विकास गंगा अशीच चालू ठेऊन पारनेर तालुक्याचा सर्वांगी विकास करण्याचा प्रयत्न करत आहे.- नामदार विजयराव औटी
तर यावेळी वडनेर गावच्या उपसरपंच पूनम खुपटे यांनी नामदार विजयराव औटी यांचे आभार मानले.
काशिनाथ दाते यांनी वाजेवाडी येथे दिलेल्या बंधारा स्मशानभूमी यामुळे तेथील ग्रामस्थाना मोठा फायदा होणार असून येणाऱ्या काळात आपण वडनेरमध्ये अशीच विकास कामे करू - उपसरपंच पूनम खुपटे
तर या कार्यक्रमाप्रसंगी वडनेर गावचे सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, माजी उपसरपंच राजेंद्र वाजे, माजी सरपंच रेखा येवले, माजी सरपंच स्वाती नर्हे, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई चौधरी, तसेच सोसायटी चेरमन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
महाराष्ट्र दर्शन NEWS https://www.mdnewsmarathi.com/ |
बातमी संकलन- सागर आतकर (संचालक संपादक महाराष्ट्र दर्शन NEWS)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद