पारनेर : तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या प्रयत्नातून वाडेगव्हान येथे १ कोटी रुपयाची विकास कामाचा श्री गणेशा अहमदनगर जिल्हा परिषदेचे बाधकाम व कृषी सभापती काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते करण्यात आला .
या उद्घाटन प्रसंगी पंचयात समितीचे सभापती बोलताना म्हणाले की, आमचे नेते मा. विधान सभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी साहेब यांनी दिलेल्या शिकवणीतून मी माझ्या मतदार संघात मागील पंचवार्षिक मध्ये सुमारे १५७ कोटी रुपयाची विविध विकास कामे मार्गी लावले आहेत. आम्ही विकासाला महत्व देतो आमचे नेते माननीय विजयराव औटी साहेब यांनी आम्हाला विकासकामांची शिकवण दिली आहे. यांच्या माध्यमातून मी आणि दाते सर विकास कामांची ही गंगा सदैव चालू ठेवणार आहोत. तसेच येणार्या काळात आपल्या पारनेर तालुक्यातील शिवसैनिकाना कोणत्याही विकास कामासाठी शिवसैनिकाना कधीही दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही. असे प्रतिपादन सभापती गणेश शेळके यांनी केले.
यावेळी सरपंच बाळासाहेब सोनवणे, नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे सर, उपसरपंच रवींद्र शेळके, मा. सरपंच संतोष शेळके, मा. सरपंच जयसिंग धोत्रे, शिवसेना ता. युवा सेना प्रमुख नितीन शेळके, डॉक्टर उध्दव शेळके, रामचंद्र शेळके, नवनाथ शेळके, चेअरमन प्रमोद घनवट, संपत शेळके, दिनेश झांबरे, अतुल शेळके व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद