जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या माध्यमातून सुमारे १ कोटी रुपयाचे विकासकामे मजूर

0

पारनेर : तालुक्यातील विविध गावांमध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या माध्यमातून विविध विकासाची कामे सुरू करण्यात आले आहेत. 

तर पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण ते राळेगण सिद्धी शिवरस्ता सुधारण्यासाठी २ लक्ष रुपये तसेच श्री. क्षेत्र तुकाईमंदिर देवस्थान भक्तनिवास परिसर शुशोभीकरनासाठी ३० लक्ष रुपये प्राप्त झाले. बांधकाम व कृषि समितीचे सभापती मा. काशीनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. तर या उद्घाटन प्रसंगी मा.सभापती गणेश शेळके बोलताना म्हनाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिति पारणेर यांच्या माध्यमातून सुमारे १ कोटी रुपयाचे विकासकामे वाडेगव्हान येथे मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये तरवडी मळा बंधारा -१५ लाख, ताऱ्हे मळा बंधारा -१५ लाख, रासकर मळा बंधारा -१५ लाख, वाडेगव्हान-राळेगणसिद्धी शिवरस्ता दुरुस्ती -३ लाख, वाडेगव्हान-नारायनगव्हान शिवरस्ता दुरुस्ती -३ लाख, तुकाई मंदिर भक्त निवास -१५ लाख, तुकाई मंदिर परिसर सुशोभीकरण  -३ लाख, तुकाई मंदिर परिसर गार्डन -१५ लाख, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पेव्हर ब्लॉक बसवने  -४० हजार असे एकूण जवळपास १ कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. 

या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिति सभापती गणेश शेळके, सरपंच बाळासाहेब सोनवणे, नारायण गव्हाण माजी सरपंच सुरेश बोरूडे, उपसरपंच रविद्र शेळके, माजी सरपंच जयसिंग धोतेरे, शिवसेना तालुका युवासेना प्रमुख नितिन शेळके, डॉ. उदय शेळके, रामचंद्र शेळके, नवनाथ शेळके, प्रमोद घनवट, संपत शेळके, अतुल शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top