येणाऱ्या पाच वर्षात राळेगण थेरपाळचा विकासात्मक चेहरा बदलणार- पंकज कारखीले सरपंच

0

पारनेर: (News महाराष्ट्र दर्शन) तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे १४ लाख ९० हजार रुपयांचा कोल्हापूर पद्धतीचा आडवा पाणीसाठा बंधाऱ्याचे उदघाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे अध्यक्ष काशीनाथ दाते, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले.

यावेळी म्हसे गावचे सरपंच प्रवीण उदमले, बजरंग मदगे, नारायण मदगे, मार्तंड जाधव, राजू शिर्के यांचा हस्ते नारळ फोडून बंधाऱ्याच्या कामास सुरवात करण्यात आली.

गेले काही वर्षे सतत दुष्काळ पडत राहिला त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना पाटाचे येणार पाणी जास्त काळ वापर करता येत नव्हते. माननीय काशीनाथ दाते सर यांना विनंती केल्या नंतर या ठिकाणी आडवा बंधारा मजूर करून काम सुरु करण्यात आले. त्यामुळे म्हसे, राळेगण, गुणोरे या गावातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याच्या मोठा फायदा होणार आहे.- पंकज कारखीले (सरपंच राळेगण थेरपाळ)


याप्रसंगी सरपंच पंकज कारखीले, मछिंद्र मदगे, प्रवीण कारखिले, सुखदेव कारखीले, भरत शोतोळे, शिरीष कारखीले, अक्षय पठारे, सुनील सोनवणे, संदीप रासकर, संकेत ढोमे, अक्षय इचके, विशाल रासकर, पप्पू कारखीले, राहुल मोरे, अंकित कारखीले, दीपक कारखीले, शशिकांत कारखीले, नरेश सोनवणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

News महाराष्ट्र दर्शन
https://www.mdnewsmarathi.com/?m=1


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top