टाकळी ढोकेश्वर - वडगाव सावताळ येथे सुरू असलेले श्री. दत्त सावताळ बाबा कोव्हीड सेंटर हे कोव्हीड रुग्णांनासाठी जीवदान ठरत आहे. आतापर्यंत ५५ एवढे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गावचे सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी कोव्हिड सेंटर सुरू केले आणि या परिसरातील बऱ्याच लोकांनी उपचार घेतले आतापर्यंत ५५ रुग्ण या कोव्हीड सेंटर मधून बरे होऊन घरी गेले आहेत.
सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना हॉस्पिटल भेटत नाहीत, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर भेटत नाहीत. अशा परिस्थितीत पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी कोव्हीड सेंटर सुरू केले आहे. सध्या या कोव्हीड सेंटर मध्ये सध्या २५ रुग्ण उपचाराधीन आहेत तर आतापर्यंत सुमारे ५५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांचा एचआरसिटी स्कोर जास्त असणारे देखील व वयस्कर ६५-७० वय असणारे रुग्ण देखील या कोव्हीड सेंटर मधून बरे होऊन घरी गेले आहेत.
विशेष म्हणजे या कोव्हीड सेंटर मध्ये वडगाव सावताळ गावचे सरपंच बाबासाहेब शिंदे दिवसरात्र रुग्णांसाठी मेहनत घेत आहेत. सर्व रुग्णांना आपुलकीचा प्रेमाचा आधार देत आहेत. त्यांचे सर्व सहकारी दत्तात्रय सरोदे, पोपट सरोदे, गणपत व्यवहारे, दत्तात्रय व्यवहारे, कुमार भोपाळ, रवी केदरी, सविता आठवे (आशा सेविका),दत्ता थापे हे सर्व रुग्णांची चौकशी करून त्यांना काय हवे नको ते पाहत आहेत.
परिसरातील ग्रामस्थांनी मदत करण्याचे आव्हान वडगाव गावचे सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी केले आहे.
चौकट-जाहिरातबाजी करून चालवलेल्या मोठ्या कोविड सेंटरला भरभरून मदत मिळते. परंतु छोट्या गावातील कोवीड सेंटरचे काय अशा कोविड सेंटरला प्रशासकीय मदत मिळावी. - बाबासाहेब शिंदे (सरपंच)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद