पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यावर श्रीगोंदा येथील संत शेख महंमद बाबा शेख मंदीरात निळोबाराय महाराज पादुकांची भेट झाली.

0

पारनेर: अहमदनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पारनेर तालुक्यातील श्री. क्षेत्र पिंपळनेर येथील निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मोजक्याच भाविकांसह दोन शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सोमवारी सकाळी दहा वाजता संजीवनी समाधीचे पूजन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, प्रातिधिकारी सुधाकर भोसले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रस्थान सोहळ्या प्रसंगी ह.भ.प. विकासानंद मिसाळ महाराज यांचे किर्तन झाले. 


ह.भ.प बबन महाराज पायमोडे निळोबाराय महाराजांची वशंज मनसुब मकाशीर आदी महाराजांच्या बरोबर पंधरा वर्षं पायी वारी केली. वारीत असताना स्वत: भाकरी थापल्या. वारीमध्ये जो आनंद आहे तो इतर कुठेही मिळत नाही. पंढरपूरची वारी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात लाखो लोकांची गर्दी असतानाही येथील वारकरी नियमाचे पालन करतो त्यामुळेच वारीत मिळणारा आनंद काही वेगळाच असतो- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे


पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यावर श्रीगोंदा येथील संत शेख महंमद बाबा शेख मंदीरात निळोबाराय महाराज पादुकांची भेट झाली. 

यावेळी निळोबाराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव पठारे कार्याध्यक्ष अशोक राव सावंत, निळोबाराय महाराज पालखीचे प्रमुख निळोबाराय महाराज यांचे वशंज गोपाळ काका मकाशीर, जिल्हा बँक माजी सदस्य सुरेश ज्ञानदेव पठारे, सरपंच सुभाष गाजरे, निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे सचिव लक्ष्मण खामकर, निळोबाराय सेवाभावी संस्था सचिव चांगदेव शिर्के, विणेकरी पांडुरंग रासकर, भाऊसाहेब लटाबंळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाडे,  शिरूर नगरसेवक निलेश लंटाबळे, देवद्र लंटाबळे आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top