पारनेर: तालुक्यातील निघोज येथील शिरसुले येथे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते वैष्णवी ऑप्टिक सणसवाडीचे मालक व मानव सुरक्षा संघाचे पारनेर तालुकाध्यक्ष अक्षय घोगरे यांनी आपला वाढदिवस हा कुठलाही अनाठायी खर्च न करता अगदी सध्या पद्धतीने साजरा केला. केक न कापता सणसवाडी व शिक्रापूर परिसरातील 350 गरीब गरजू लोकांना मास्क, सॅनिटाईझर, नाष्टा देत आपला वाढदिवस साजरा केला. अक्षय घोगरे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून तसेच निघोज येथूनही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. याप्रसंगी त्यांच्या सोबत त्यांचे मित्र मयुर चव्हाण, तुषार मडके, प्रदीप आडे, कोशिक साउ हे उपस्थित होते.
वैष्णवी ऑप्टिकचे अक्षय घोगरे यांचा वाढदिवसानिमित्ताने स्तुत्य उपक्रम
जुलै २०, २०२१
0
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद