पळशी येथे विठू माऊलीचा गजर करत आषाढी एकादशी साजरी

0

पारनेर: तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. क्षेञ पळशी येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे कोरोणाच्या महामारीमुळे प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमावलीचे पालन करत अत्यंत साध्या पद्धतीने विठू माऊलीचा गजर करत आषाढी एकादशी पळशीतील भाविकांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाली.

दरवर्षी निघणारी आषाढी वारी बंद आहे. मात्र ठराविक वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर आषाढीचा उत्सव सोहळा सुरू आहे. यात विठुरायाच्या भक्तीपोटी भाविक भक्त आपल्या परीने आणि जमेल त्या पद्धतीने लोक विठुरायाची पूजा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री. क्षेञ पळशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपारिक पद्धतीने मात्र कोरोनाच्या सावटाखाली शासनाच्या सर्व कोरोना  नियमावलीचे पालन करत विठू माऊलींचे भाविकांनी दर्शन घेतले. सकाळपासूनच याठिकाणी विठू माऊलींचा गजर भाविकांनी केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पहाटे चार वाजता अभिषेक सोहळा याठिकाणी संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्ताने पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन हरीपाठ गायन केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत पळशी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व कमिटी यांनी प्रशासनाला सहकार्य करत आनंदाने आषाढी एकादशी साजरी केली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top