निघोज येथे शनिवारी लोकमत व कन्हैय्या उदयोग समुहाकडुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
निघोज: लोकमतचे संपादक स्वांतञ्यसेनानी स्व.जवाहरलाल ऊर्फ बाबुजी दर्डा यांच्या पुण्यतिथीनिम्मत  " लोकमत रक्ताच नात"  या मोहिमेत कन्हैय्या उदयोग समुह उस्फुर्त सहभाग घेत असल्याची माहीती कन्हैय्या डेअरी फार्मचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके यांनी दिली. रक्तदात्यांना लोकमत व कन्हैय्या उदयोग समुहाकडुन विशेष सन्मान पञ व विशेष भेट  देण्यात येणार आहे.रक्तदान शिबिराचे उदघाटन कन्हैय्या उदयोग समुहाचे संस्थापक शांताराम लंके हे करणार आहेत. कन्हैय्या दुध उदयोग समुहाने हजारो शेतकरी व हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला  आहे. कन्हैय्या डेअरी फार्म दरवर्षी भव्य सप्ताहाचे आयोजन करुन किर्तनकारांच्या माध्यमातुन धार्मिक प्रबोधन करुन लाखो भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करीत आहे. परंतु कोरोनामुळे अखंड हरिनाम सप्ताह बंद आहे. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे. लोकमतने लोकमत रक्ताच नात हा सुरु केलेला उपक्रम नक्कीच देशासाठी दिशादर्शक आहे. यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कन्हैय्या उदयोग समुह यामध्ये सहभागी होवुन समाजाप्रती आपली बांधिलकी जपणार असल्याची माहीती चेअरमन मच्छिंद्र लंके यांनी दिली.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top