पारनेर तालुक्यातील 2 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार - सुरेश ढवण

0
पारनेर : तालुक्यातील निघोज येथील पठारवाडी येथे मीरा क्लिनफ्युल्स लिमिटेड मुंबई व मळगंगा क्लिनफ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच माता मळगंगा एग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या नव्याने सुरू होत असलेल्या कंपनीचा भूमिपूजन पायाभरणी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आलेल्या मान्यवरांच्या व संचालक अध्यक्ष मंडळ यांच्या हस्ते पूजा करून नारळ वाढून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. आलेल्या मान्यवरांनी या कंपनीस शुभेच्या दिल्या व येणाऱ्या काळात या कंपनीने संपूर्ण देशात नावलौकिक करावा असे गौरवउद्गगार काढले.  
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने म्हणून आमदार निलेश लंके साहेब, MCL कंपनीचे प्राईम बी.डी.ए रणजित दातिर, जितेश सरडे, अमित ढोले - जुन्नर, राजेंद्र हाडवळे - आळे, कंपनीचे अध्यक्ष सुरेश ढवण, उपाध्यक्ष रामदास लंके, संचालक प्रकाश थोरवे, रायचंद गुंड, रामदास रसाळ, अशोकराव मेसे, सोमनाथ वरखडे, दिलीप ढवण, संदिप ढवळे, एकनाथ लामखडे, सौ.रंजना ढवण, सौ शोभा टिकेकर, आर्किटेक् मयुर डोंगरे, इंजिनियर विनायक डेरे, शिवाशेठ लंके, पांडुरंग बेलोटे, भाऊसाहेब पानमंद, कचरशेठ कारखिले, भाऊसाहेब कवडे, सखाराम गोरडे, भगवान डेरे, संतोष ढवण, लहू ढवण, रमेश ढवण, सुरेश रसाळ, विलास कोल्हे, संदेश थोरात तसेच सर्व MVP ओनर्स व सभासद या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कंपनीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील 2 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून आता यापुढे तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी इतर ठिकाणी स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही- कंपनीचे संचालक सुरेश ढवण
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले तर आभार दिलीप ढवण यांनी मानले.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top