पारनेर: तालुक्यातील बाभुळवाडे येथील केदारेश्वर विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब ढूस व प्राध्यापक सोनवणे यांचा सेवानिवृत्ती सोहळा केदारेश्वर विद्यालयाने चांदीची कर्मवीर मुद्रा देऊन संपन्न केला. यावेळी विद्यालय कमिटी सदस्य जगदाळे सर, राऊत सर, सोनवणे सर, ठुबे मॅडम, पावडे मॅडम, वंदनाताई वाळुंज, राहुल ढूस, सुमन चव्हाण, कोल्हे सर, पप्पू पायमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य भाऊसाहेब ढूस व प्राध्यापक सोनवणे यांनी केदारेश्वर विद्यालय विद्यार्थी शिक्षक व कमिटी मेंबर यांचे आभार मानत. येणाऱ्या काळात जनसेवेसाठी आपण नक्कीच कटिबद्ध राहून चांगले काम करू असे आश्वासन दिले.
आपल्या कुटुंबाला सोडताना अतिशय वाईट वाटत आहे. 32 वर्ष कार्यकाळात रयत शिक्षण संस्थेत सर्वानी मला घरच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे सामावून घेऊन संस्थेमधील शिक्षकांनी ही मला खुप वेळोवेळी मदत केली त्यामुळे मला कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही.- प्राचार्य लोंढे सर
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद