बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

0

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार हे ९८ वर्षाचे होते. आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. २९ जून रोजी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु प्रकृती बिघडल्याने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. हिन्दी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखलं जायचं. तसेच त्यांना हिन्दी सिनेसृष्टीतील मेथड अॅक्टिंग क्रेडिट यांनाच दिले गेले. दिलीप कुमार यांना tragedy king म्हणूनही ओळखले जात. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. १९४४ साली प्रदर्शित करण्यात आलेला ज्वारभाटा हा त्यांचा पहिला चित्रपट तर १९९८ साली प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top