जामगाव या ठिकाणी रामेश्वर पेट्रोलियम उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

0

पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील जामगाव या ठिकाणी रामेश्वर पेट्रोलियम उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या उद्घाटनाच्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा युवराज माळी, युवराज यशवंत माळी, पारनेर पंचायत समिती उपसभापती सुनंदा सुरेश धुरपते, उद्योजक सुरेश धुरपते, ज्येष्ठ जगन्नाथ भुजबळ, उद्योजक अशोक मुथा, उद्योजक अमित मुथा, डॉ. डोंगरे यांच्या हस्ते नारळ वाढून व पूजा करून उदघाटन समारंभ संपन्न झाला. 

गेले कित्येक वर्षे जामगाव व परिसरातील ग्रामस्थाना पेट्रोल व डिझेलसाठी लांब जावे लागत होते मात्र या पंपामुळे आता दूर न जाता गावात आपल्या गावातच पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. याचे समाधान वाटते.- युवराज यशवंत माळी(संचालक रामेश्वर पेट्रोलियम)

या उद्घाटन सोहळ्यासाठी सुनंदा सुरेश धुरपते, पंचायत समिती उपसभापती, सुरेश धुरपते उदोजक, जगन्नाथ भुजबळ, उद्योजक अमितभाऊ मुथा, अशोकभाऊ बन्सीलाल मुथा, डॉ.डोंगरे, बाळासाहेब हिलाळ, संजय गंगाधर गुळवे, युवराज यशवंत माळी, सागर युवराज माळी, मनीषा युवराज माळी माजी जिल्हा परिषद सदस्य, शुभम युवराज माळी, कृषी अधिकारी एकनाथ बापू गोलवड, सचिन रंगनाथ पवार सर, कैलास गाडीलकर, बाळासाहेब शिंदे, मुकुंदा शिंदे, अप्पा मेहेर, प्रभाकर मुंजाळ, समीर मांढरे, संतोष मेहेर, दत्ता बांगर, पप्पूशेट बांगर, सोनू शेट बांगर, रामभाऊ खाडे, बाळासाहेब सोबले विविध कार्यकारी सोसायटी व्हाईस चेरमन आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी संकलन व फोटो: निलेश जाधव


Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top