संदीप पाटील वराळ जनसेवा संपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

0

पारनेर / प्रतिनिधी : निघोज ग्रुप ग्रामपंचायत व निघोज ग्रामस्थ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निघोज ग्रामपंचात कार्यालयात तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा संपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान पदाधिकारी व अल्पसंख्याक समाजाचे नेते सतिष साळवे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.  

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे कार्य समाजाला दिशादर्शक आहे. त्यांनी आपल्या समाजव्यवस्थेसाठी जे कार्य केले आहे ते सर्व समाजाला प्रेरणादायी आहे.- सचिन पाटील वराळ( अध्यक्ष संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन)

यावेळी  अल्पसंख्याक समाजाचे मार्गदर्शक व मुस्लिम समाजाचे तालुका नेते अस्लम भाई इनामदार, सुलतान सय्यद( बार्टी समता दूत) प्रकाश साळवे, बाळासाहेब साळवे, बाबाजी वाघमारे, बाबाजी साळवे, शशिकांत साळवे, कचरु साळवे, कैलास साळवे, विष्णू अल्हाट, शिवाजी वैरागर, किशोर जाधव रवींद्र साळवे, अरुण साळवे, अर्जुन वैरागर, विकी साळवे, साहिल कसबे, यश साळवे, शुभम साळवे, प्रतीक वरखडे, दिनेश दुबे, मच्छिंद्र दुतारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top