पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या ढिसाळ कारभार मुळे हरणाचा मृत्यू

0

पारनेर: तालुक्यातील कर्जुले हर्या येथे चार दिवसांपूर्वी एका अपघातामध्ये हरिण जखमी झाले होते. तेथील काही भटक्या कुत्र्यांनी अपघातानंतर जास्त प्रमाणात जखमी केले होते. त्यानंतर येथील तरुणांनी कुत्र्याच्या तावडीतून हरणाचे प्राण वाचवले मात्र त्या हरणाच्या उपचारासाठी त्यांना वणवण भटकावे लागले. टाकळीढोकेश्वर येथील खाजगी डॉक्टर शेळके यांच्या साह्याने त्या हरणावर प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यानंतर टाकळी ढोकेश्वर येथील वन विभाग यांच्याकडे हरणाला सुपूर्त करण्यात आले मात्र पशुवैद्यकीय अधिकारी व दवाखान्यातील कर्मचारी त्या ठिकाणी हजर नव्हते खूप वेळ वाट पाहून साडेदहा नंतर परिचर बोरुडे हे त्या ठिकाणी हजर झाले व त्यांनी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले व त्या ठिकाणाहून निघून गेले त्यानंतर राष्ट्रीय जनकल्याण संस्थेचे प्रवक्ते अविनाश उबाळे यांनी विचारपूस केली तर त्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रभारी डॉक्टर किंवा अधिकारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. गेले कित्येक वर्ष या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये शेतकऱ्यांचीही अधिकाऱ्यांकडून अडवणूक होत आहे. त्याठिकाणी कोणतेही डॉक्टर किंवा अधिकारी वेळेवर हजर राहत नाहीत, दवाखाना उघडला तरी अधिकारी मात्र त्या ठिकाणी उपस्थित नसतात. त्यामुळे कर्जुले हर्या येथील तरुणांनी खाजगी डॉक्टर शेळके यांच्या मदतीने उपचार करून पाठवले होते. परंतु त्या हरणाचा मृत्यू चार दिवसानंतर झाला या हरणाच्या मृत्यूला कारणीभूत  पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी व त्यांचा ढिसाळ कारभार असल्याचा आरोप राष्ट्रीय जनकल्याण संस्थेचे प्रवक्ते अविनाश उबाळे यांनी केला आहे. 

पुढील काळात जर असा ढिसाळ कारभार व शेतकऱ्यांची अडवणूक झाली तर राष्ट्रीय जनकल्याण संस्थेमार्फत मोठे आंदोलन उभारण्यात येईल.- अविनाश उबाळे






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top