आदर्श गाव हिवरे बाजारचे अनुकरण करत गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करू - सरपंच सौ. चित्राताई सचिन वराळ

0

पारनेर / निघोज प्रतिनिधी : तालुक्यातील निघोजच्या सरपंच सौ. चित्राताई वराळ या हिवरे बाजार येथे चार दिवस सरपंच प्रशिक्षण शिबिरास आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. या चार दिवसात आदर्श गाव हिवरेबाजार या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करत आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी येथे केलेली विकास कामे, तेथे राबविलेल्या ग्रामविकास योजना व गावविकासाला पूरक वातावरण हे सर्व नियोजन पाहून अशाच प्रकारे निघोज येथे हिवरे बाजार पॅटर्न राबवून गावचा विकास साधणार असल्याच्या भावना सरपंच सौ. चित्राताई सचिन वराळ यांनी व्यक्त केल्या. 

तुम्ही आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला त्यात नक्की यश येईल. यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते करील - पोपटराव पवार (आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच)

आदर्श गाव हिवरेबाजार सरपंच पोपटराव पवार यांचे अमूल्य व सर्वश्रेष्ठ मार्गदर्शनाच्या जोरावर आरोग्य विषयक प्रश्न, पाणी समस्या, ग्राम स्वच्छता अभियान, विविध विकासकामे याबाबत युवक, ग्रामस्थ व जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅटर्न राबविणार आहे. सरपंच प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरे बाजारचे अनुकरण करत गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करू.- सरपंच सौ. चित्राताई सचिन वराळ

चार दिवस आदर्श गाव हिवरेबाजार या ठिकाणी उपस्थित राहून प्रशिक्षण घेतल्याबद्दल आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी सरपंच चित्राताई सचिन वराळ यांचे कौतुक केले. व सरपंच सौ.चित्राताई सचिन वराळ यांना प्रशस्तीपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top