जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदिप पाटील वराळ यांच्या प्रयत्नातून गुणोरे ते निघोज रस्ता डांबरीकरण मंजूर

0

पारनेर / निघोज प्रतिनिधी : जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदिप पाटील वराळ यांच्या प्रयत्नातून गुणोरे ते निघोज रस्ता डांबरीकरणास मंजूर मंजूरी मिळाली असून गुणोरे ते निघोज रस्ता डांबरीकरण करणे-15 लक्ष रुपये, गुणोरे (इंदिरानगर) रस्ता काँक्रीटीकरण करणे-6 लक्ष रुपये असा निधि असून या कामांचा भूमिपूजन समारंभ संदिप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.ग्रामविकास अधिकारी श्री.बाजीराव गोपाळे हे होते.

तसेच कार्यक्रम प्रसंगी सरपंच बाळासाहेब खोसे, उपसरपंच कचरशेठ कारखिले, ग्रामसमृद्धी पतसंस्थेचे मॅनेजर राजेशजी गोपाळे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मेसे, दत्ता गोपाळे, निघोज ग्रामपंचायत सदस्य मंगेशदादा लाळगे, अस्लमभाई इनामदार, युवा नेते महेंद्रदादा मेसे, आम्ही गुणोरेकर फौंडेशनचे अध्यक्ष विकास बढे, किशोर गोपाळे, संपतराव मेसे, विशाल कारखिले, प्रमोद कारखिले, बन्सीशेठ मेसे, दादाभाऊ ढवळे, अशोक मेसे, मच्छिन्द्र गोपाळे, संजय गोपाळे, महेंद्र बढे, लहू बोचरे, युवराज बढे, नवनाथ गोपाळे, राघू गोपाळे, बाबू जाधव, आप्पासाहेब बढे सर, भाऊसाहेब बढे, श्रीनिवास बढे, निलेश घोडे, अमीर शेख, रोहन दूतारे, ठेकेदार इंजि.सचिन दूतारे, इंजि.नागेश रोहकले आदींसह गुणोरे ग्रामस्थ उपस्थित होते.








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top