मदत नव्हे कर्तव्यच या भावनेतून शिवबा संघटनेचा उपक्रम

0

पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील निघोज येथील शिवबा संघटनेचे पदाधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील महाड व तेथील परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

गेले काहि दिवसापुर्वी रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. तेथील रस्ते बंद झाले होते. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे आपण प्रसारमाध्यमांत पाहिले होते. मात्र खरी दाहकता ज्यावेळी मदत घेउन महाड व परीसरात शिवबा संघटनेची टीम पोहचल्यावर वास्तवता पाहिल्यानंतर लक्षात येते.

या समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मदत नव्हे कर्तव्यच या सामाजिक भावनेतून सामाजिक उपक्रम राबविला- अध्यक्ष अनिल शेटे

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाड, सव या गावात जाऊन पुरग्रस्ताना मदतीचा हात दिला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्व सहकार्याना समाधान झाले.

यावेळी शिवबा संघटनेच्या टीम मध्ये अनिल शेटे, मार्गदर्शक राजु भाऊ लाळगे, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास लामखडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील वरखडे, राजु लंके, विट्ठल लामखडे, तानाजी लामखडे, खंडु साहेब लामखडे, शांताराम लामखडे, संतोष लामखडे, बाबाजी लामखडे आदी सहकार्यांच्या उपस्थितीत मदत करण्यात आली.




Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top