पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील कडूस येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल पाटील शिंदे, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पारनेर शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा वार्षिक योजना ३०५४ अंतर्गत कडूस ते येवती रस्ता (ग्रामा-१८८)मजबुतीकरण व डांबरीकरण करणे-१५ लक्ष या कामाचा समावेश आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज पाटील, कडूस चे माजी सरपंच भिवसेन मुंगसे, सरपंच मनोज मुंगसे, उपसरपंच छायाताई रावडे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मुंगसे, नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे सर, सारोळा सोमवंशी चे सरपंच राहुल आढाव, ग्रामपंचायत सदस्य मीनाताई मुंगसे, संजय रावडे, मच्छिंद्र नरवडे, एकनाथ गायकवाड, गणेश रावडे, योगेश रावडे, तुषार काळे, बबन रावडे, अण्णासाहेब मुंगसे, शिवाजी दिवटे, संपत रावडे, मंगेश काळे, संतोष करंजुले, राजेंद्र रावडे, अशोक रावडे,भागचंद गायकवाड, योगेश जाधव, गणेश जाधव, सुनील पंडित, उज्वला रणसिंग, लक्ष्मण काळे, ग्रामसेविका आश्लेषा ताजणे, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता संकेत शेंडगे, कामाचे ठेकेदार फारुक शेख, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मुंगशे यांनी केले प्रस्ताविक युवराज पाटील तर आभार ग्रामसेविका आश्लेषा ताजणे यांनी मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद